Tuesday, May 21, 2013

                                                      मी 

मी अशी हि, मी तशी मी,
सुवर्णजडीत लक्ष्मीही मी ,
खद्गहस्ति दुर्गहि मी ,
कौसल्येची मायाही मी,
कैकेयीची असूयाही मी,
ज्वलंत ज्वाळांची दाहिनी हि मी,
लवलवत्या ज्योतीची समयी हि मी,
दवबिंदूंची रेखाही मी,
खळाळत्या पाण्याचा झराही मी,
मी प्रेरणा, मी साधना,
मी स्वामिनी, मी दामिनी,
राधेची प्रीती मी, मीरेची रीत मी,
सीतेची आशाही मी, अहिल्येचा पाषाण मी,
तपस्वी शंभूची गौरी मी,
झाशीची राणी हि मी,
कृष्णाची राधा, माधवाची रमा ,
पद्मिनी हि मी आणि मंदोदारीही मीच,
अशी हि मी, तशी हि मी,
किती तरी रूपात मी … 

No comments:

Post a Comment